अंतिम जाहिरात २०२६ · अर्जदारांसाठी अधिकृत माहिती
कागदपत्रे
अर्जासोबत सादर करावयाच्या कागदपत्रांची संपूर्ण यादी
महत्त्वाचे: सर्व अपलोड केलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित असावीत. अर्ज अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही नवीन कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.
०१
Application checklist
अर्जदाराने अर्जासोबत खालील कागदपत्रे जमा करावीत
- संबंधित ग्रामपंचायत/महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्राचे संबंधित प्राधिकरणाचे ग्रामसेवक/ आयुक्त/ मुख्याधिकारी यांचे स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) किंवा रहिवासी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे (टी सी प्रत/शालांत परीक्षा प्रमाणपत्र इ.वयाचा पुरावा)
- आधार कार्ड व पॅन कार्डची प्रत.
- शैक्षणिक कागदपत्रे - बारावी उत्तीर्ण, पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रे (लागू असल्यास).
- MS-CIT अथवा CCC प्रमाणपत्र.
- बँक खात्याचे स्टेटमेंट मागील (६ महिन्यांचे ) स्वयंसाक्षांकित प्रत
- चारित्र्य प्रमाणपत्र ( संबंधित पोलीस स्टेशनचे चालू महिन्याचे चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तथापि चारित्र्य प्रमाणपत्र नसल्यास चारित्र्य प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची पोच पावती जोडावी परंतु मुलाखतीवेळी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक)
- अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी चालवायचे आहे त्या जागेचे आतील व बाहेरील फोटो. (GPS कॅमेराद्वारे काढलेले)
- सीएससी (CSC) प्रमाणपत्र (असल्यास जोडावे)
- दिव्यांग/ माजी सैनिक/ स्वयंसहायता गटाचे सदस्य असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र/ स्थानिक उद्योजक असल्यास त्याचा पुरावा.
- जागा स्वत:ची असल्यास जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे (घर कर पावती (२०२५-२६ व त्यानंतर) अथवा ग्रामपंचायतीचे नमुना नं. ८ तसेच जागा स्वत:ची नसल्यास कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे जागा आहे त्या व्यक्तींशी असलेले नातेसंबंधाबाबतचे स्वयंघोषणापत्रासह घर कर पावती (२०२५-२६ व त्यानंतर) अथवा ग्रामपंचायतीचे नमुना नं. ८)
- जागा भाड्याची असल्यास नोटरी केलेले भाडेकरारपत्र.
- अर्ज शुल्क स्वतःचे बॅंक खात्याद्वारे रु.५००/- ऑनलाईन भरल्याची पावती.
- अर्ज सादर करतांना अर्जदाराने आवश्यक सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील, त्यांनतर अर्जदाराकडून कुठलेही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.