अंतिम जाहिरात २०२६ · अर्जदारांसाठी अधिकृत माहिती
तपासणीचे टप्पे
अर्जापासून अंतिम निवडीपर्यंतचा प्रवास
Application lifecycle
अर्ज तपासणीचे विविध टप्पे
-
१
प्राथमिक कागदपत्र छाननी
अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक छाननी करून पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
-
२
पात्र/अपात्र यादीवरील हरकती व अंतिम पात्र/अपात्र यादी
पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती मागविण्यात येतील. प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
-
३
प्रत्यक्ष कार्यालय पाहणी
पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी तपासणी पथकाद्वारे करण्यात येईल. तपासणीबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
-
४
मुलाखत
पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने तपासणी झाल्यानंतर मुलाखतीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
-
५
संरचित मुलाखत व गुणवत्ता यादी
जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत पूर्ण झाल्यावर १०० गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध करण्यात येईल.
-
६
प्राथमिक निवड यादीवरील हरकती
प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती मागविण्यात येतील. याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
-
७
अंतिम निवड यादी
प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
महत्त्वाची सूचना
आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या संबंधित शासन निर्णयांमधील निर्देशांनुसार करण्यात येईल.
संबंधित शासन निर्णय:
- शासन निर्णय क्र. मातंस-१७१६/प्र. क्र. ५१७/३९, दिनांक १९ जानेवारी २०१८
- सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक-आसेकें-१७२५/प्र.क्र. ८६/मातं (३९), दिनांक २७ मार्च २०२५
- इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग शासन निर्णय क्र. आसेकें-2026/प्र.क्र. 98/TECH-1 (E-1742666), दिनांक ०९ जुलै २०२६
नोंद: संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदारांनी वरील अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना व निर्देश तपासावेत. या संदर्भात कार्यालयाकडून स्वतंत्र पत्रव्यवहार किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला जाणार नाही.